बेळगाव | जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलंय - शुभम शेळके
बेळगाव, १७ एप्रिल: हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलं आहे, अशा शब्दात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शेळकेंनी मतदानाचा हक्क बजावला.
बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. बेळगाव लोकसभेसाठी एकूण 23 जणांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या के. पी. पाटील यांच्यासह 8 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी आणि भाजपतर्फे मंगला अंगडी निवडणूक लढवत आहेत. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना चिन्हावरील आक्षेपानंतरही ‘सिंह’ हेच निवडणूक चिन्ह मिळाले आहे
मतदानाचा हक्क लोकशाहीने दिलेला आहे. त्या माध्यमातून मी मतदान केलं. माझा अनुक्रमांक 9 असल्याने ‘नव’मतदार म्हणून मी मतदान केलं. 9 शुभांक मानला तरी वावगं ठरणार नाही. मराठी माणसाने ठरवलं की आपल्या माणसाला मतदान करायचे तर आमचा विजय दूर नाही. मी लहानपणापासून या लढ्याशी जोडलो गेलो आहे. पण अलिकडच्या काळात बेळगावात इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला” असं शुभम शेळके म्हणाले.
आमचे अंतिम ध्येय महाराष्ट्रात सामील होणे हेच आहे. इथे मराठी माणसाची गळचेपी होते, शिवरायांचा अपमान, शिवरायांची साक्ष देणाऱ्या भगव्या झेंड्याची विटंबना, याची चीड व्यक्त करण्याचे माध्यम ही निवडणूक आहे. इथे लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढायला मराठी माणूस ही निवडणूक संधी म्हणून पाहात आहे” असंही शेळके म्हणाले.
आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रातून समिती विरोधात प्रचाराला कोणी येणार नाही. कारण हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांना या प्रश्नाचे सोयर सुतक आहे. असं वाटत नाही. मुळात हा प्रश्न निर्माण केला काँग्रेसने आणि भाजपला या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. ज्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हाला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असंही शुभम शेळके यावेळी म्हणाले.
News English Summary: This fight is not between Belgaum and Karnataka but against Maharashtra and Karnataka. Those who came from Maharashtra to campaign against us have proved themselves traitors to Maharashtra, said Shubham Shelke, a candidate of the Maharashtra Unification Committee in the Belgaum Lok Sabha by-election, targeting Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis. Shelke exercised his right to vote.
News English Title: Belgaum Shubham Shelke criticized Devendra Fadnavis over rally in Belgaum against Marathi peoples news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो