15 January 2025 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

मोदींना शिखर धवनच्या दुखापतीची काळजी; बिहारमध्ये चमकी तापाने १६५ बालक मृत्युमुखी पण..?

Narendra Modi

पाटणा : बिहारमध्ये चमकी तापाचं थैमान अजून सुरु असून मृत बालकांची संख्या १६५ वर पोहोचली असून ३०० जण अद्यापही या अत्यंत गंभीर तापाच्या धोक्यातून बाहेर आलेले नाहीत. तसेच इतर इस्पितळांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारी देखील अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. या एकूण मृत बालकांमध्ये ८५ टक्के प्रमाण हे मुलींचे असल्याने इथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १६५ मृत बालकांमध्ये ८५ टक्के मुलींचे प्रमाण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यामुळे या आजाराची लागण झालेल्या भागात कुपोषणाची स्थिती किती भयंकर आहे हे देखील उघड झाले आहे. कुपोषणामुळे मुलींचा सर्वाधिक बळी जातो. रक्तात लोहाची कमतरता असल्याने याचा धोका वाढतो ही देखील इथली गंभीर समस्या आहे.

गुजरातसंबंधित एखादी दुर्घटना झाल्यास दुसऱ्याच मिनिटाला सतर्कतेचे इशारे देऊन स्वतः त्या घटनेवर लक्ष ठेऊन राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशभर योग इव्हेन्ट करून आरोग्याचे धडे देत होते. तसेच सध्या त्यांना भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनच्या दुखापतीची भयंकर चिंता असल्याने त्यांना बिहारमधील चिंताग्रस्त परिस्थितीकडे पाहण्यास वेळ मिळाला नसावा असंच एकूण वातावरण आहे. त्यामुळे देश जगाला योगाच्या नावाने आरोग्याचे धडे देत असला तरी ती केवळ एक राजकीय ड्रामेबाजी आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x