23 December 2024 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मजुरांवरील संकटाला स्वतःसाठी संधी बनवू नका, विशाल ददलानीचा पंतप्रधांना टोला

PM Narendra Modi, music director Vishal Dadlani, Bihar Poor Welfare Employment Campaign

नवी दिल्ली, २० जून : ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.

बिहारमधील खगरियामधून अभियांचा शुभारंभ करण्यात आला. ”लॉकडाउनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले. त्यामुळे अनेक मजूर आपापल्या गावी परतले. यामध्ये बऱ्याच मजुरांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे स्थलांतरामुळे ज्या लोकांचे काम सुटले त्यांना आता रोजगार मिळणार” असल्याचं मोदींनी म्हटलं. तसंच या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरा जवळ काम मिळावं, असा आमचा हेतू आहे. आतापर्यंत मजुरांनी त्यांच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी दिली. मात्र आता ते गावांसाठी करावे, असं आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे.

या अभियानावरून गायक व संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. गरीब कल्याण रोजगार अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील खगरिया येथून प्रारंभ केला. यावेळी त्यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर संगीत दिग्दर्शक व गायल विशाल ददलानीनं एक ट्विट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. “खूपच भारी. लॉकडाउनच्या वेळी स्थलांतरित मजुरांविषयी ना विचार केला, ना कोणतीही व्यवस्था केली. त्यामुळे हे मजूर शहरातून गावाकडे परतले आहे, हे आपण कदाचित विसरला असाल. हजारो लोक अनवाणी पायाने, रिकाम्या पोटी, लाचार होऊन आपापल्या गावाकडे पायी निघाले. कित्येक अर्ध्या प्रवासातच मरण पावले. त्यांच्यावरील संकटाला स्वतःसाठी संधी बनवू नका,” असा टोला विशालनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

 

News English Summary: The Central Government has launched the Poor Welfare Employment Campaign to provide employment to the migrant workers. Prime Minister Narendra Modi launched the campaign on Saturday (June 20) from Bihar. With this campaign, singer and music director Vishal Dadlani has targeted Prime Minister Narendra Modi.

News English Title: Bihar Poor Welfare Employment Campaign singer and music director Vishal Dadlani has targeted Prime Minister Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x