16 January 2025 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

VIDEO | शुद्राला शुद्र बोललं, तर वाईट वाटतं | भाजपा खासदारचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

BJP Bhopal MP Pragya Singh Thakur, Controversial statement

भोपाळ, १३ डिसेंबर: वेळोवेळो वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Bhopal BJP MP Pragya Singh Thakur ) यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. Sadhvi Pragya Singh Thakur’s statement on caste system at a program in Sehore, Madhya Pradesh is likely to ignite political controversy.

साध्वी प्रज्ञा यांनी या कार्यक्रमात बोलताना जाती व्यवस्थेचे समर्थन (Speaking on the occasion, Sadhvi Pragya supported the caste system) केले. प्राचीनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्याला वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं कारण काय आहे? जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या घटनेवरून खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला (MP Pragya Singh Thakur targeted West Bengal Chief Minister Mamata Banerjee) आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज येणार आहे. आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यानेच ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत,” अशी टीका ठाकूर यांनी केली.

 

News English Summary: Speaking on the occasion, Sadhvi Pragya supported the caste system. In ancient times, four characters were created in our scriptures for the arrangement of society. If Kshatriya is called Kshatriya, anger does not come, if Brahmin is called Brahmin, anger does not come, if Vaishya is called Vaishya, anger does not come, but if Shudra is called Shudra, they feel bad.

News English Title: BJP Bhopal MP Pragya Singh Thakur again made controversial statement News updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x