27 January 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

पवारांच्या ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण | पण भाजपने संधी साधली

BJP, Sharad Pawars old letter, private sector participation, Agriculture market

नवी दिल्ली, ७ डिसेंबर: देशभरात शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गेले १२ दिवस दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून उद्या ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. “शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची व्याप्ती देशभर पसरेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६ डिसेंबर) दिला होता. यादरम्यान समाज माध्यमांवर शरद पवारांची जुनी पत्रं व्हायरल झालं असून याच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ऑगस्ट 2010 मध्ये त्यांनी लिहिलेलं पत्र सध्या व्हायरल झालं आहे. याशिवाय शरद पवारांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही नोव्हेंबर २०११ मध्ये अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी कृषी कायद्यातील सुधारणांसह खासगी गुंतवणूक, APMC कायद्यातील बदलाची गरज. सरकारी बाजार समित्यांसह खासगी बाजाराची गरजही व्यक्त केली होती.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्पष्टीकरणानंतर देखील भारतीय जनता पक्षाने संधी साधून विरोधकांना कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर टीका करायची आहे. मोदी सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. APMC च्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनीही २०१० मध्ये पत्र लिहिलं होतं. आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळचा विसर पडला आहे असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Opposition parties are opposing the Narendra Modi govt for the sake of opposition, forgetting their own work in the past. In its 2019 poll manifesto, Congress promised to repeal APMC Act & make trade of agriculture produce including export free from all restrictions says Union minister RS Prasad

News English Title: BJP criticized oppositions after Sharad Pawar’s old letter regarding private sector participation in agriculture market news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x