खा. सनी देओल'च्या मतदारसंघातील महापालिकांच्या सर्व २९ जागांवर भाजपचा सुपडा साफ

चंदीगड, १७ फेब्रुवारी: पंजाबमध्ये स्थानिक महापालिका आणि नगर परिषद निवडणूक निकाल आज (बुधवारी) जाहीर होत आहेत. यासाठी मतगणना सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडत असलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिलीय. दुपारी १२.३० वाजेपर्यंत काँग्रेसनं पाच महानगर पालिकांत विजय मिळवला आहे. यामध्ये मोगा, होशियारपूर, कपूरथला, बठिंडा आणि अबोहर या महानगरपालिकांचा समावेश आहे.
१४ फेब्रुवारी रोजी इथे ८ महानगरपालिका, १०९ नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी २३०२ वॉर्डांमध्ये निवडणूक पार पडली होती. पालिकांचा विचार केल्यास मजिठामध्ये १३ पैकी १० जागांवर अकाली दलाने विजय मिळवला आहे. तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने ११ तर अकाली दलाने २ जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये १५ पैकी १५ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. तर जलालाबादमध्ये १७ पैकी ९ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसची सत्ता आली आहे. राजपूरामध्ये २७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर मतदारसंघातील सर्व २९ जागांवर भाजपचा पराभव झाला असून, या जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाची या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे. भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.
News English Summary: Local body and municipal council election results in Punjab are being announced today (Wednesday). The counting of votes is underway. Remarkably, in this election, which is being held at the time of the farmers’ agitation on the Delhi border, the voters have given a strong slap to the ruling BJP at the Center. Congress has won in five Municipal Corporations till 12.30 pm. These include Moga, Hoshiarpur, Kapurthala, Bathinda and Abohar Municipal Corporations.
News English Title: BJP got big setback in Punjab Gurdaspur municipal council seats after farmers protest news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL