22 February 2025 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध

BJP, Amit Malviya, Prashant Kishor

कोलकत्ता, १० एप्रिल: राजकारणाची रणभूमी झालेल्या पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी मतदान होत असून, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे. ४४ जागांसाठी तब्बल ३७३ उमेदवार रिंगणात असून, १ कोटी १५ लाख ८१ हजार २२ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे मतदानाच्या दिवशी काही गोष्टी अर्धवट प्रसिद्ध करून मतदाराला प्रभावित करताना, प्रसार माध्यमांमध्ये त्यासंदर्भात वृत्त कशी प्रसिद्ध होतील याची नियोजनबद्ध योजना भाजप IT सेल नेहमीच आखत असतो. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे. आज पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी भाजप पुरस्कृत संभ्रम कसा पसरेल याची काळजी भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी घेतली आहे. आज सकाळीच त्यांनी नियोजित खोडसाळपणा केला आहे. त्यांनी संपूर्ण चर्चा न दाखवता, केवळ चर्चेतील विशिष्ठ माहिती उचलून संभ्रम निर्माण केल्याचं संबधित पत्रकार सांगत आहेत.

मालवीय यांनी आज सकाळच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कोलकाता येथील क्लब हाऊसमध्ये तृणमूल काँग्रेसच्या झालेल्या एका बैठकीतील गुप्त संभाषण बाहेर फुटल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. आपले बोलणे इतर लोकांकडून ऐकले जात आहे, ही बाब लक्षात येताच तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने बोलायचे थांबवले, असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे.

मालवीय यांच्याकडून ज्या संभाषणाचा दाखला दिला जात आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरणाची भाजपची चाल यशस्वी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या लोकसंख्येत साधारण 27 टक्के मतदार असलेल्या अनुसूचित जातीचे लोक आणि मतुआ मतदार हे भाजपला मतदान करतील. काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने गेल्या 20 वर्षात मुस्लिमांचे तुष्टीकरण केले, अशी कबुलीही तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने दिल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे. त्यांच्या ट्विटला जेमतेम हजार रिअक्शन आहेत. पण माध्यमांवर मोठी बोंबाबोंब असल्याचं पाहायला मिळतंय.

मात्र याच क्लब हाऊसमध्ये उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी याबद्दल देखील ट्विट करताना म्हटलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे की, “भाजपाला प्रशांत किशोर यांचा संपूर्ण चाट प्रसिद्ध करायला सांगा” असं आव्हान केलं आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने अनेक प्रसार माध्यमांना हाताशी धरून हवानिर्मितीची योजना आखल्याचं यापूर्वीच समोर आलं आहे. त्याला भाजपचा आयटी सेल नियोजनबद्ध कॅश करतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

 

News English Summary: In an internal poll conducted by the Trinamool Congress, Mamata Banerjee’s defeat is inevitable. The BJP will win this year’s assembly elections, according to experts who have been campaigning for Mamata Banerjee. Amit Malviya, head of the BJP’s IT cell, has claimed that the secret conversation at the West Bengal club house has been leaked and now the defeat of the Trinamool Congress is inevitable.

News English Title: BJP leader Amit Malviya claim over Prashant Kishor public chat news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x