अशा प्रकारे मरणाऱ्या मुली शेतात, नाल्यात आणि झुडपातच सापडतात | भाजप नेता बरळला
बाराबंकी , ७ ऑक्टोबर : हाथरस प्रकरणी पीडितेबाबत उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने लज्जास्पद वक्तव्य केले आहे. दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर भाष्य करताना या भाजप नेत्याने आरोपी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या मुली या उसाच्या, भाताच्या, बाजरीच्या शेतीत, नाल्यांमध्ये आणि जंगलात मृतावस्थेत सापडत असतात. असे का?, कारण त्यांच्या मरणाच्या जागाच त्या असतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य या भाजप नेत्याने केले आहे.
हा भाजप नेता इतकेच बोलून थांबला नाही. आरोपी निर्दोष असून त्यांना सोडून दिले गेले पाहिजे, असेही हा नेता म्हणाला. पकडली गेलेले तरूण जर निर्दोष सिद्ध झाले, तर मग त्यांचे तुरुंगात गेलेले तारुण्य कोण परत देणार, असा सवालही त्यांनी विचारला.
“मुलीनं मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल, कारण प्रेमप्रसंग होता. ही गोष्ट सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरही आली आहे. मुलीला पकडलं गेलं असेल. शेतामध्ये असंच होतं. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदुळाच्या शेतात का सापडत नाहीत? या गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? यांची मरण्याची जागा तीच आहे. कुठेही ओढून नेल्या जात नाहीत. यांना ओढून नेताना कुणी पाहत नाही. मग या घटना यांच्या सोबत का घडतात? हे देशपातळीवर माहिती आहे, मी काहीही चुकीचं बोललो नाही. पण मुलगी दोषी नाही, मुलं दोषी आहेत,” असं वादग्रस्त भाष्य श्रीवास्तव यांनी केलं आहे.
#VIDEO – अशा प्रकारे ज्या मुली मरतात, त्या शेतात, नाल्यात आणि झुडुपात सापडतात…….कारण त्यांच्या मरणाच्या जागाच त्या असतात……भाजप नेता श्रीवास्तव बरळला.#HathrasGangrape #UttarPradesh #BJPLeader pic.twitter.com/2d0otI9Fou
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 7, 2020
News English Summary: A BJP leader from Uttar Pradesh’s Barabanki claimed that the four upper-caste men accused of brutally gangraping and killing a 19-year-old Dalit woman in UP’s Hathras are “innocent” and it is the victim who was “awaara” (wayward). “Such girls are found dead in only some places. They will be found dead in sugarcane, corn and millet fields or in bushes, gutters or forests. Why are they never found dead in paddy or wheat fields?” he can be heard. Srivastava implies that the Hathras victim’s death was an honour killing.
News English Title: BJP leader from Barabanki Ranjeet Srivastav gives derogatory remark on Hathras victim Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News