22 January 2025 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

प. बंगाल भाजपाला धक्का | भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. मुकूल रॉय तृणमूलमध्ये प्रवेश करणार

CM Mamata Banerjee

कोलकाता, ११ जून | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींचे पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली होती. अनेक आमदारांनी हाती कमळ घेतलं. मात्र तरीही तृणमूलनं २०० हून अधिक जागा जिंकत राज्यात हॅटट्रिक साधली. भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेच्या आशेनं गेलेल्या नेत्यांची आता चलबिचल सुरू झाली आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मुकूल रॉय यांचा क्रमांक वरचा आहे. मुकूल रॉय यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तृणमूलला रामराम केला होता. परंतु, आता ते तृणमूलमध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत तृणमूलच्या नेतृत्त्वानं मुकूल रॉय यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. यानंतर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलमधून भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सुवेंदू अधिकारी यांना पक्षात अधिक महत्त्व दिलं जात असल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.

 

News Summary: After defeating the Bharatiya Janata Party in the West Bengal Assembly elections, now Trinamool Congress president and chief minister Mamata Banerjee is all set to push the country’s largest party. Bharatiya Janata Party national vice-president Mukul Roy and his son Subhranshu Roy are expected to return home to the Trinamool. The news agency ANI has reported about this. Mukul Roy will visit Mamata Banerjee’s party headquarters this evening. Abhishek Banerjee is also expected to attend the meeting.

News Title: BJP leader Mukul Roy likely to ditch BJP return to TMC meet Mamata Banerjee today news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x