23 February 2025 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

प. बंगाल | भाजपा सत्तेत आली तर पोलिसांना बूट चाटायला लावू - राजू बॅनर्जी

BJP leader Raju Banerjee, TMC, Police will lick boots

कलकत्ता, २५ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाचे नेते राजू बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर टीका करताना बंगाल पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधानं केलं आहे. “राज्यातील पोलीस आम्हाला मदत करत नाही. जर भाजपा सत्तेत आली तर पोलिसांना बूट चाटायला लावू” असं विधान त्यांनी केलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते राजू बॅनर्जी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मंगळवारी दूर्गापूरमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे ते पाहा. राज्यात गुंडा राज असलेलं तुम्हाला पाहिजे का? पोलीस कुठलीही मदत करायला तयार नाहीत. अशा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काय करायला पाहिजे? आम्ही त्यांना बूट चाटायला लावू” असं भाजपा नेते राजू बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप करत आंदोलन छेडलं आहे. दरम्यान, भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यात सर्वात वाईट स्थिती असल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: Do you want a rogue state in the state? The police are not ready to help. What should be done with such police personnel? BJP leader Raju Banerjee has said that we will make them lick their shoes. BJP leaders have started agitation alleging that law and order has not been maintained in Mamata Banerjee’s government. Meanwhile, BJP general secretary Kailash Vijayvargiya has said that the situation regarding women’s safety is the worst in the state.

News English Title: BJP leader Raju Banerjee slams TMC says police not extending help will make them lick boots News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x