27 December 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या DSP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP बचतीवर मिळतील 1 कोटी 11 लाख रुपये, संधी सोडू नका Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
x

भाजपाची आयटी सेल कामातून गेली बेकार झाली | बनावट आयडीने माझ्यावर हल्ले

BJP Leader Subramaniam Swamy, BJP IT Cell, Amit Malviya, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पार्टीच्या आयटी सेलवर निशाणा साधला आहे. भाजपचे आयटी सेल बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल करीत आहे. जर माझे समर्थक असे करण्यास सुरूवात करतील तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या आयटी सेलबद्दल पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून तक्रार केली आहे. स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “भाजपाच्या आयटी सेल कामातून गेली बेकार झाली आहे. काही सदस्य बनावट आयडीचा वापर करून माझ्यावर हल्ले करत आहेत. मग माझ्या संतप्त समर्थकांनी उत्तर देण्यास सुरूवात केली, तर मी त्याला जबाबदार असणार नाही. ज्याप्रमाणे माझ्यावर होत असलेल्या हल्ल्यांना भाजपाला जबाबदार ठरवता येणार नाही,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना लक्ष्य केले. मी याकडे दुर्लक्ष करीत आहे पण भाजपाने त्यांना त्वरित हटविले पाहिजे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. याशिवाय, मालवीय पात्र ही संपूर्ण गडबड करीत आहेत. आम्ही रावण किंवा दुशासन नव्हे तर मर्यादा पुरुषोत्तम रामाची पार्टी आहोत, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले आहे.

 

News English Summary: BJP Rajya Sabha MP Subramanian Swamy Monday accused the party’s Information and Technology (IT) cell head Amit Malviya of running a campaign against him using fake tweets. He, however, refused to specify what the campaign was about. “The BJP IT cell has gone rogue. Some of its members are putting out fake ID tweets to make personal attacks on me,” Swamy tweeted.

News English Title: BJP Leader Subramaniam Swamy Attacks BJP IT Cell Amit Malviya Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BJPITCell(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x