3 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

JEE आणि NEET परिक्षा घेण्यावरून स्वामींचा मोदी सरकारला 'विपरीत बुद्धी' टोला

BJP Leader Subramanian Swamy, Modi Government, JEE and NEET exams, vipreet buddhi

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. “जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती,” असं त्यांनी सांगितलं आहे.

“जेईई परीक्षेसाठी साडे आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामधील सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. शिक्षण नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे,” असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचा परीक्षा घेण्याचा हट्ट पाहून भाजपचे नेते सुब्रमणिअम स्वामी यांनी मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. याबाबत ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “JEE आणि NEET परीक्षावरून कोणते राष्ट्र विपरीत बुद्धी म्हणून ओळखलं जाईल ते वेळच सांगेल.”

 

News English Summary: BJP leader Subramaniam Swamy has slammed the Modi government for insisting on taking the exam from the central government. “Only time will tell which nation will be identified as the opposite intellect from the JEE and NEET exams,” he tweeted.

News English Title: BJP Leader Subramanian Swamy slams Modi Government over JEE and NEET exams decision News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x