23 January 2025 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

नंदीग्राममधून शुभेंदु अधिकारी विजयी | पक्षासाठी फिरताना स्वतःच्या मतदारसंघांसाठी वेळ अपुरा पडला

BJP leader Suvendu Adhikari

कोलकत्ता, ०२ मे | संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

बंगालमध्ये अवघ्या चार तासात तृणमूल काँग्रेसने बहुमतासाठी लागणारा 148 चा आकडा पार केला होता. दरम्यान, बंगालमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या नंदीग्राम मतदारसंघाचाही निकाल समोर आला आहे. येथे ममता बॅनर्जींचा निसटता विजय झाला आहे. ममतांनी भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांना अवघ्या 1200 मतांनी पराभूत केले.

1972 पासून आतापर्यंत गेल्या 49 वर्षांमध्ये बंगालमध्ये ही 11 वी निवडणूक आहे आणि जो पक्ष जिंकत आहे, त्यांचा 200+ जागांचा ट्रेंड कायम आहे. तृणमूलने 2016 मध्ये 211 आणि 2011 मध्ये 228 जागा जिंकल्या होत्या. त्यापूर्वी 7 वेळा सलग लेफ्टने निवडणूक जिंकली होती. केवळ 2001 मध्ये लेफअटला 200 पेक्षा 4 कमी म्हणजेच 196 जागा मिळाल्या. इतर निवडणुकांमध्ये लेफ्टला नेहमीच 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या.

 

News English Summary: In Bengal, the Trinamool Congress had crossed the 148 mark required for a majority in just four hours. Meanwhile, the results of the most talked about Nandigram constituency in Bengal have also come to light. Here Mamata Banerjee’s runaway victory has come. Mamata defeated BJP’s Shubhendu Adhikari by just 1200 votes.

News English Title: BJP leader Suvendu Adhikari won election against Mamata Baneerjee in Nandigram news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x