23 February 2025 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ट्रम्प वहिनींच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करू शकतात ना? | भाजप नेत्याला प्रश्न

BJP leader Tajindar Bagga, Permanently suspending, Donald Trump, twitter account

नवी दिल्ली, ९ जानेवारी: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.

बुधवारी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पूर्णपणे सस्पेंड केलं आहे. अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांचं अकाउंट सस्पेंड केल्याचं कारण ट्विटरने दिलं आहे. हिंसाचाराला उद्युक्त करण्याच्या जोखमीमुळे आम्ही त्याचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं आहे. ट्विटर नियमांचं उल्लंघन केल्यानं हे पाऊल उचलल्याचं, ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

मात्र त्यानंतर भाजपचे नेते तजिंदर पाल बग्गा यांना एक भीषण प्रश्न पडला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “ट्रम्प वहिनींच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करू शकतात ना…फक्त विचारतोय..

भाजपचे नेते तजिंदर पाल बग्गा यांचं प्रश्न रास्त असला तरी याबाबत अमेरिकन सरकारने आधीच खबरदारी घेतली आहे. कारण अमेरिकन फर्स्ट लेडीचं अकाउंट अमेरिकन सरकारने आधीच ताब्यात घेऊन त्यावर तसे बदल केले आहेत.

 

News English Summary: Following the violence, Twitter blocked Trump’s account for 12 hours. In addition, several tweets were deleted from his Twitter account. But now Twitter has completely suspended Donald Trump’s Twitter account. Twitter has given a reason for suspending his account so that such violence does not happen again. We have permanently suspended his account for the risk of inciting violence. Twitter has clarified that this step was taken due to violation of Twitter rules. But then BJP leader Tajinder Pal Bagga has a big question. In this context, he tweeted, “Can Trump tweet from his wife’s Twitter handle … just asking

News English Title: BJP leader Tajindar Bagga twit after permanently suspending Donald Trump twitter account news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x