16 April 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

भाजपप्रणीत एनडीए'मध्ये मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता? सविस्तर वृत्त

NDA, Shivsena, RLD, JDU

नवी दिल्ली: भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप पाठोपाठ शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, २०१४ मधील मोदी लाटेनंतर एनडीए’चं राजकारण मोदी आणि अमित शहा केंद्रित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर एकामागे एक सहा इतर राज्यात विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचे परिणाम दिसू लागले आणि परिणामी भाजपअधिक उन्मत्त होऊ लागला. त्यात सर्वात मोठ्या घटना म्हणजे स्थानिक पक्षांचं अस्तित्व शिस्तबद्ध संपविण्याच्या योजना भाजप आखू लागला आणि काँग्रेसमुक्त भारतात स्वतःचीच एकाधिकारशाही देशभर कशी प्रस्थापित करतात येईल यासाठीच सत्ता वापरू लागला. सत्तेच्या आडून केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सहकारी पक्षांवर देखील दबाव सुरु झाल्याचं पाहायला मिळालं.

मात्र याविरोधात तोंड उघडणार कोण आणि सहकारी पक्षांना संधी नक्की कधी प्राप्त होणार याची उत्सूकता होती. तीच संधी नेमकी महाराष्ट्रात चालून शिवसेनेला चालून आली आणि शिवसेनेनं देखील ऐतिहासिक पाऊलं उचलत भाजपशी फारकत घेण्याच्या शिस्तबद्ध हालचाली सुरु केल्या आणि राज्यात लवकरच सेनेचा मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपसोबत ते शक्य होणार नाही याची चुणूक शिवसेना नैतृत्वाला लागली होती आणि त्यात शरद पवारांसारखे मुरलेले राजकारणी सेनेच्यासोबतीला आणि राज्यात ऐतिहासिक अशी महाशिवआघाडी जवळपास उदयास आली आहे आणि ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून एनडीए’साठी धोक्याची सूचना आहे असं राजकीय विश्लेषक मानतात.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला पंजाबमधील मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार धक्का दिला होता. तेव्हा विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका शिरोमणी अकाली दल (एसएडी) स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केलं, मात्र तिथे काँग्रेस सत्तेत आली असली तरी केवळ पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठी शिरोमणी अकाली दलचा वापर करण्याचा उद्देश होता हे देखील वास्तव आहे.

दुसरीकडे यापूर्वी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या तेलगू देसमने तडकाफडकी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा एकत्र झालेल्या आंध्र प्रदेशात वायएसआर’च्या लाटेत तेलगू देसमचा सुपडा साफ झाला आणि काँग्रेसमधीलच फुटीर पक्ष असलेल्या वायएसआर’च्या अध्यक्षांना आलिंगन देण्यास मोदींनी सुरुवात केली आणि तिथेच त्यांना २०२४च्या निमित्ताने शिवसेनेला पर्याय ठरणारा नवा सहकारी पक्ष दिसू लागला. मात्र, वायएसआर’चे अध्यक्ष कधीच सावध होतील अशी शक्यता अधिक आहे.

तसेच शिवसेनेच्या निर्णयानंतर ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीला अनुसरुन रामविलास पासवान यांनी देखील भाजपला धक्का दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचा झालेला काडीमोड पाहून एनडीएतील घटकपक्ष लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) झारखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोक जनशक्ती पक्षाची धुरा खांद्यावर घेतलेले खासदार चिराग पासवान यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. झारखंडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं आहे. लोजप ५० जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

शिवसेनेने झटका देताच हरयाणात भाजप आधीच सावध झाली. कारण १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपला हरियाणात जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा आधार घ्यावा लागला आणि हवं तसं वाकण्यास कबूल झाले आहेत असंच सध्या चित्र आहे.

त्यामुळे सध्या एनडीए’चे घटकपक्ष असलेले पक्ष २०२४ पर्यंत भाजपसोबत राहतील आणि लोकसभा निवडणुका जाहीर होताच स्वतःच अस्तित्त्व जपण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढतील अशी शक्यता अधिक आहे, अन्यथा काँग्रेसप्रणित आघाडीत सामील होतील. सध्याचं राजकारण आणि अर्थकारण पाहता २०२४मध्ये अँटिइन्कबंसी’चा देखील भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या