आगामी लोकसभा | भाजपला जाट समाजाच्या केवळ 'या' पट्ट्यातच ४० जागांवर फटका बसणार

चंदीगड, १७ फेब्रुवारी: पंजाबमध्ये स्थानिक महापालिका आणि नगर परिषद निवडणूक निकाल आज (बुधवारी) जाहीर होत आहेत. यासाठी मतगणना सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडत असलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिलीय. दुपारी १२.३० वाजेपर्यंत काँग्रेसनं पाच महानगर पालिकांत विजय मिळवला आहे. यामध्ये मोगा, होशियारपूर, कपूरथला, बठिंडा आणि अबोहर या महानगरपालिकांचा समावेश आहे.
१४ फेब्रुवारी रोजी इथे ८ महानगरपालिका, १०९ नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी २३०२ वॉर्डांमध्ये निवडणूक पार पडली होती. पालिकांचा विचार केल्यास मजिठामध्ये १३ पैकी १० जागांवर अकाली दलाने विजय मिळवला आहे. तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने ११ तर अकाली दलाने २ जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये १५ पैकी १५ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. तर जलालाबादमध्ये १७ पैकी ९ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसची सत्ता आली आहे. राजपूरामध्ये २७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर मतदारसंघातील सर्व २९ जागांवर भाजपचा पराभव झाला असून, या जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाची या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे. भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाला शेतकरी रोषाचे राजकीय फटके बसण्यास सुरुवात झाली आहे असं सध्या चित्र आहे. त्यात पंजाब, हरयाणासह पश्चिम उत्तर प्रदेशात या पट्ट्यात शेतकरी पसरु लागल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंगळवारी हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील पक्ष नेत्यांसोबत चर्चा करुन त्यांच्याकडून परिस्थिती समजून घेतली. जाट समाजाच्या नाराजीचा या भागातील लोकसभेच्या ४० जागांवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे हे आंदोलन आणखी पसरणार नाही, याची भारतीय जनता पक्षाला काळजी घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांना खाप नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. कृषी कायद्यावरुन लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामधील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना रणनिती बनवण्याची सूचना करण्यात आली आहे.
News English Summary: At present, the Bharatiya Janata Party (BJP) is facing political blows from the farmers. The BJP leaders are worried about the spread of farmers in Punjab, Haryana and western Uttar Pradesh. The senior BJP leadership on Tuesday held discussions with party leaders in Haryana, Rajasthan and western Uttar Pradesh to understand the situation. The displeasure of the Jat community could affect 40 Lok Sabha seats in the area. Therefore, the BJP will have to take care that this agitation does not spread further. Local leaders have been asked to stay in touch with khap leaders. Bharatiya Janata Party (BJP) office bearers in Uttar Pradesh, Punjab and Haryana have been instructed to come up with a strategy so that people are not misled by the Agriculture Act.
News English Title: BJP may get huge set back in Punjab Haryana and western Uttar Pradesh Jat belt during loksabha elections news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE