लोकं डोळ्यादेखत मरताहेत, आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराचं मुख्यमंत्री योगींना पत्र
लखनऊ, ०७ मे | देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
कालच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
दुसरीकडे उत्तर प्रदेशातही अत्यंत भीषण परिस्थिती उद्भवल्याने आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. कोरोनामुळे सामान्य लोकांसहित भाजपचे आमदार देखील आणि मंत्री देखील मृत्युमुखी पडत आहेत. परिणामी भाजपचे आमदारच हतबल होऊन योगी सरकारला धारेवर धरून प्रश्न उपस्थित
उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर भारतीय जनता पक्षाचे आमदारच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यातील परिस्थिती भीषण असून मदतीसाठी येणाऱ्यांना उपचारदेखील पुरवता येत नसल्याची पत्रं अनेक आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवली आहेत. लखीमपूर खिरीचे आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून असहायता व्यक्त केली आहे.
सामान्य लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.
News English Summary: Only BJP MLAs are questioning the Uttar Pradesh government’s corona management. Many MLAs have sent letters to Chief Minister Yogi Adityanath stating that the situation in the state is dire and they cannot even provide treatment to those who come for help. Lakhimpur Khiri MLA Lokendra Pratap Singh has sent a letter to the Chief Minister expressing his helplessness.
News English Title: BJP MLA Lakhimpur Khiri MLA Lokendra Pratap Singh has sent a letter to CM Yogi Adityanath on corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम