23 November 2024 7:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

येडियुरप्पा सरकारकडून पाटबंधारे विभागात २१,४७३ कोटीचा घोटाळा | भाजप नेत्याकडून आरोप

BJP MLA Vishwanath

बंगळुरू, १८ जून | भाजपाच्या कर्नाटकमधील सरकारच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण आता आरोप विरोधक नव्हे तर थेट भाजपमधीलच महत्वाचे नेते करू लागले आहेत. अनेक आमदार आणि मंत्री सध्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. परिणामी दिल्लीतील भाजप वरिष्ठांच्या देखील अडचणीत वाढ होणार आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे भाजपाचे एएच विश्वनाथ यांनी त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. पाटबंधारे विभागाने आर्थिक मंजुरी न घेता घाईत २१,४७३ कोटी रुपयांचा निविदा काढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यामध्ये घोटाळा झाला असल्याचा देखील विश्वनाथ म्हणाले. एएच विश्वनाथ हे विधान परिषद सदस्य आहेत.

विश्वनाथ यांनी येडियुरप्पा यांचा मुलगा आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय. विजयेंद्र यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. विश्वनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले, “भद्रा अप्पर कालवा प्रकल्प व कावेरी पाटबंधारे प्रकल्पांशी संबंधित पाटबंधारे विभागात २० हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे कंत्राट तयार केले गेले आहे. वित्त विभागाकडून कोणतीही आर्थिक मंजुरी घेण्यात आली नाही, मंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हे घाईघाईने केले गेले” असं ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP MLA Vishwanath Alleges rupees 21473 Crore Tender Scam news updates.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x