8 January 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
x

इंटरनेट महाभारताच्या काळापासून होतं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आमदारांचं महाभारत

BJP MLAs, Tripura, Rebellion against CM

आगरतळा, १३ ऑक्टोबर : त्रिपुरात सत्तेवर असणाऱ्या भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या दोन-तृतीयांश आमदारांनी नेतृत्वबदलाची मागणी करत मुख्यमंत्री बिप्लब देव (Chief Minister Biplab Kumar Deb) यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा स्वीकारला आहे.

त्रिपुरात भाजपचे 36 आमदार आहेत. त्यातील 25 आमदार देव यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे समजते. त्यातील 12 आमदारांनी थेट दिल्लीला धाव घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन ते नेतृत्वबदलाची (Chief Minister Biplab Kumar Deb) मागणी करणार आहेत.

देव यांच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आणि गैरकारभारामुळे भाजपचे नुकसान होत आहे. पक्ष जनतेपासून दुरावू लागला आहे. त्याचा फटका 2023 मधील विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा इशारा असंतुष्ट आमदारांनी दिला आहे. नेतृत्वबदलामुळे आणि मंत्रिमंडळ फेररचनेमुळे भाजपचे नुकसान टाळले जाऊ शकते, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटण्याची असंतुष्ट आमदारांची योजना आहे.

आता त्रिपुरातील आमदारांचे बंड थोपवण्याचे आव्हान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे आहे. त्या राज्यात नेतृत्वबदल होणार की आमदारांचे मन वळवण्यात भाजपला यश येणार हे पुढील काळात समोर येईलच.

 

News English Summary: Tripura Chief Minister Biplab Kumar Deb is facing massive dissent amid the Covid-19 pandemic as a group of rebel BJP MLAs from the state are camping in New Delhi since Friday night to demand his ouster. While it is unclear what triggered this sudden move, sources in the dissident camp told ThePrint there was growing dissatisfaction and anger in the state and within the party against Deb’s “dictatorial style of governance”, administrative inefficiency in healthcare besides “a range of issues”.

News English Title: BJP MLAs in power in Tripura in the sanctity of rebellion Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x