23 December 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
x

भाजप खासदाराची TMC नेते आणि मुख्यमंत्र्यांना धमकी, म्हणाला लक्षात ठेवा...

BJP MP Parvesh Singh

नवी दिल्ली, ०४ मे | राज्यात विधानसभेची निवडणूक संपताच राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. तर सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवेश साहिब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते धमकी देत म्हणाले की, लक्षात ठेवा टीएमसीच्या नेत्यांना आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनादेखील दिल्लीत यावे लागते.

दरम्यान, ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. तसेच त्यांनी गाडीची तोडफोड करत अनेक घरांना आगी लावल्या. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो पण हत्या नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, तुमच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीत यावे लागते अशी धमकी ही त्यांनी यावेळी दिली.

भाजप खासदार अनिल बलूनी यांचा तृणमूलवर हल्लाबोल
उत्तराखंडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बलूनी यांनीही काल झालेल्या घटनेवर तृणमूलवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओही त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केला असनू त्यात त्यांनी लिहिले की, ‘बंगालमधील हिंसाचारांची ही पटकथा यापूर्वीच लिहिलेली गेलेली होती. खुद्द ममता बॅनर्जी यांनी सेंट्रल फोर्स गेल्यावर तुम्हाला कोण वाचवणार असे म्हटले होते.’ म्हणजेच बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा खेळ टीएमसीने आधीच सेट केला होती. लज्जास्पद! असे लिहीत त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केले.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party office in Kolkata was set on fire. On Monday, it was reported that two party workers had been beaten to death. Against this backdrop, West Delhi Lok Sabha constituency MP Parvesh Sahib has made a controversial statement. “Remember, TMC leaders and even the chief minister himself have to come to Delhi,” he threatened.

News English Title: BJP MP Parvesh Singh threat TMC over West Bengal situation news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x