23 December 2024 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
x

VIDEO | जन्मदात्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला भाजप खासदाराची कानाखाली लगावण्याची धमकी

BJP MP Pralhad Singh Patel

भोपाल, २३ एप्रिल: देशातील कोरोनास्थिती भयावह आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मोठा आहे. महाराष्ट्रासह आता देशाचे राजधानी शहर असलेल्या दिल्लीतील कोरोना परिस्थितीही प्रचंड बिघडली आहे. दिल्लीतील रुग्णालयातही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र त्याच ऑक्सिजन वरून राजकीय नेत्यांचे धक्कादायक प्रकार देखील समोर येतं आहेत.

दरम्यान आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने दोन कानाखाली लगावण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री आणि दामोहचे खासदार प्रल्हाद सिंह पटेल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रल्हाद सिंह पटेल सरकारी रुग्णालयात दाखल आपल्या आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या व्यक्तीला दोन कानाखाली लगावेन असं बोलताना दिसत आहेत.

हा व्यक्ती प्रल्हाद सिंह पेटल यांच्याकडे रुग्णालयात ऑक्सिजन संकट निर्माण झाल्याची तक्रार करत होता. यामुळे खासदारांचा पारा चढला आणि कानाखाली लावण्याची धमकी दिली. संबंधित व्यक्तीने यावेळी वापरलेली भाषा ऐकून प्रल्हाद सिंह पटेल भडकले होते.

 

News English Summary: The coronary state of sesame is frightening. The shortage of oxygen is great. Along with Maharashtra, the situation in Corona, now the capital city of the country, has also deteriorated drastically. Hospitals in Delhi are also facing severe oxygen shortages. The situation is dire in many parts of the country. But from the same oxygen, shocking types of political leaders are also emerging.

News English Title: BJP MP Pralhad Singh Patel threaten to com0n person who was demanding for oxygen for his mother news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x