3 December 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

नाना पटोले आणि उदयनराजेंची दिल्लीत भेट | पण नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेने आश्चर्य

BJP MP Udayanraje Bhonsale, Congress Nana Patole

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी: साताऱ्यातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचा राजकारणापलीकडील स्वभाव सर्वश्रुत आहे. खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या मानाप्रमाणेच वागतात किंवा बोलतील असाच अनुभव आहे. आतादेखील त्यांच्या अशाच एका कृतीची समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर नाना पटोले सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी गेले होते. नेमक्या त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी त्याच परिसरातून जात होती. तेव्हा उदयनराजेंनी नाना पटोले यांनी गाडीतून पाहिले आणि त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली.

दरम्यान या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं आहे. तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अँड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असं सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केलं आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party’s Rajya Sabha MP from Satara Udayan Raje Bhosale’s nature beyond politics is well known. It is an experience that MP Udayan Raje Bhosale behaves or speaks according to his dignity. Even now, one such act of his is being hotly debated on social media and in political circles.

News English Title: BJP MP Udayanraje Bhonsale and congress state president Nana Patole meet at Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x