16 April 2025 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

उद्धव ठाकरेंविरोधात लिहिणाऱ्यांवर राज्यात अत्याचार | भाजपचं शिष्टमंडळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे

BJP MP Vinay Sahasrabuddhe, CM Uddhav Thackeray, National Human rights Commission, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर : भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एचएल दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपा खासदारांनी राज्यातील ८ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.

राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि डॉ. विकास महात्मे यांनी आयोगाला सांगितले की, डिसेंबर २०१९ पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत.

२३ डिसेंबर २०१९ रोजी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हिरामन तिवारी नावाच्या व्यक्तीने भाष्य केले, तर सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीवर हल्ला करुन जबरदस्तीने त्याचे मुंडन करण्यात आले. २६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाकडून फी वाढवल्यामुळे त्याचा विरोध करणाऱ्यांना मारहाण, पालघरमध्ये १६ एप्रिल रोजी झालेल्या दोन साधू प्रकरण, पत्रकारांना ताब्यात घेणे अशा घटनांचा उल्लेखही भाजपा खासदारांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे, अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सरकारवर निशाणा साधला. “सरकारनं बाजारात विक्रीसाठी खुप काही उपलब्ध केलंय,” असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली.

“देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणलं आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.

सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला ३० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्री सपत्तीचं मोठं नुकासान असल्याचंही राऊत म्हणाले.

 

News English Summary: Seeking to corner the Uddhav Thackeray-led coalition government in Maharashtra over recent incidents including the roughing up of a retired Navy officer, a group of BJP MPs led by party vice president Vinay Sahasrabuddhe has approached the National Human Rights Commission (NHRC) demanding a probe into the happenings. In a letter to NHRC chairperson H L Dattu, the BJP MPs have claimed that there have been several violations of rights in Maharashtra since December 2019.

News English Title: BJP MP Vinay Sahasrabuddhe Complaint against the CM Uddhav Thackeray state government to National Human rights Commission Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या