हाथरस बलात्कारातील आरोप असलेल्या तुरुंगात कोणाच्या भेटीस पोहचले भाजपा खासदार?
लखनऊ, 06 ऑक्टोबर : ‘हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्कार व नंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना हाथरसचे भाजपाचा खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी रविवारी अलिघर तुरुंगाला भेट दिली. याच तुरुंगामध्ये हाथरसमधील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींना ठेवण्यात आलं आहे.
मात्र यासंदर्भात नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राजवीर यांनी आपण कोणत्याही कैद्याची भेट घेण्यासाठी गेलो नव्हतो असं सांगतानाच तुरुंग प्रशासनाच्या जेलरने आपल्याला चहापाण्यासाठी बोलावलं होतं असं स्पष्टीकरण दिलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार राजवीर यांनी हाथरस प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलेल्या तुरुंगाला भेट दिल्याने काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राजवीर यांनी तुरुंगला दिलेली भेट संपवल्यानंतर यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण अलीघरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना (एसएसपी) भेटण्यासाठी गेल्याचे सांगितले. मात्र आपण ज्या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी गेलेलो त्याला करोनाची लागण झाल्याने त्यांची भेट घेता आली नाही. मी माझ्या समर्थकांच्या कामासंदर्भात एसएसपींच्या घरी गेलो होतो, तिथून येताना तुरुंगाबाहेर मला वाटेत काही समर्थक आपल्याला भेटले. त्यांच्याशी चर्चा करत असतानाच तुरुंग प्रशासनासाठी काम करणाऱ्या जेलरने मला चहापाण्यासाठी बोलावले, असा दावा राजवीर यांनी केला आहे.
I was standing outside the (district) jail. Meanwhile, the jailer came out & asked me to have a cup of tea. I went to his office for the tea. I didn’t meet the accused of Hathras incident: Hathras MP Rajvir Singh Diler on being asked if he met the accused (05.10.2020) pic.twitter.com/LJUo8ULJWS
— ANI UP (@ANINewsUP) October 6, 2020
दरम्यान, हाथरसप्रकरणी जे आरोपी पकडले आहेत त्यांच्या समर्थनार्थ हाथरसच्या आसपास मेळावे घेतले जातात व त्या मेळाव्यांचे नेतृत्व भाजपचे पुढारी करतात असे प्रसिद्ध झाले आहे. तसे काही खरोखरच घडले असेल तर ते कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणेच आहे.’ अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. तसंच, ‘पीडित मुलीलाच सरकारने जाळून राख केले व पुरावे मातीत मिसळले. हे सर्व हाथरसच्या पोलिसांनी ‘वर’ विचारल्याशिवाय केले काय? सगळे काही संगनमतानेच झाले आहे’ असा थेट आरोपही शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा हाथरस प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.
”मुंबईतल्या एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास ‘भगवान भरोसे’ सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे. स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावाच, पण शस्त्रखरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली. ही पहिली ठिणगी आहे. त्या ठिणगीत तेल ओतण्याचे काम तरी सरकारने करू नये. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे.
News English Summary: Hathras BJP MP Rajvir Singh Diler Sunday visited the Aligarh jail where the four accused in the gang rape and murder case of a Dalit woman are lodged, but said he had not gone there to meet any inmate and that he was invited by the jailor for a cup of tea. His visit prompted a strong reaction from the Congress which said it was “most objectionable” for the MP to do so. Talking to newspersons after his visit to the jail, Diler said he had gone to meet the Aligarh Senior Superintendent of Police (SSP), but on finding that the officer was down with Covid-19 he did not meet him.
News English Title: BJP MP Visits Jail Where Hathras Accused Are Lodged Says Jailor Invited Him For Tea Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC