15 November 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा

BJP nationwide politics, Corona vaccine, Maharashtra

मुंबई, ८ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.

प्रसार माध्यमांनी केलेल्या पडताळणीत स्पष्ट झाले की, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगड राज्यांनी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सलग आरटीपीसीआर कमी केल्या. म्हणूनच या राज्यांत संसर्ग वाढला. फेब्रुवारीपर्यंत देशात ६१% आरटीपीसीआर चाचण्या होत होत्या. ५० टक्केही आरटीपीसीआर न करणारी निम्मी राज्ये आहेत. १२ राज्यांत ७०%हून अधिक आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. पाच राज्यांत ५०% हून अधिक, पण निश्चित प्रमाणापेक्षा अशा कमी चाचण्या करत आहेत. १२ राज्यांत हे प्रमाण ४०%हून कमी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही विविध राज्यांतील चाचण्यांची ही स्थिती मान्य केली आहे.

दुसरीकडे राज्यातील भाजपचे नेते लसीकरणावरून राजकारण करत असताना एक किळसवाणं राजकारण आकडेवारीतून समोर आलं आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता ज्या राज्यांत आहे, तेथे रुग्ण संख्या किती, लोकसंख्या किती याचा कोणताही आढावा न घेता त्या राज्यात मोठ्या प्रमाणात लस पुरवण्याचे नियोजन आहे, तर ज्या राज्यात विरोधी पक्षांची सत्ता आहे त्या राज्यांची लोकसंख्या आणि त्यांना दिलेले डोस पाहिले तर केंद्राने लस वाटपात केलेला पक्षपात स्पष्टपणे समोर येत आहे.

भाजपशासित राज्यांना मिळणारे डोस : (१५ ते २० एप्रिल)

राज्य लोकसंख्या – डोस मिळणार

  1. उत्तरप्रदेश १९.९५ कोटी ४४,९८,४५०
  2. मध्य प्रदेश ७.२५ कोटी ३३,७६,२२०
  3. कर्नाटक ५.२८ कोटी २९,०६,२४०
  4. हरियाणा २.५३ कोटी २४,६८,९२०
  5. गुजरात ६.८६ कोटी १५,५७,८७०

भाजपशासित नसलेल्या राज्यांना मिळणारे डोस

  1. महाराष्ट्र ११.२३ कोटी १७,४३,२८०
  2. आंध्रप्रदेश ४.९३ कोटी १०,५८,१७०
  3. छत्तीसगड २.७९ कोटी ६,८४,२९०
  4. केरळ ३.१८ कोटी ४,७४,७१०
  5. राजस्थान ६.८६ कोटी ३,८३,२६०

कोणत्या राज्यात किती टक्के वॅक्सिंन वाया गेले? (अधिकृत आकडेवारी)

  1. तेलंगणा – १७.५%
  2. आंध्र प्रदेश – ११.५%
  3. उत्तर प्रदेश – ९.४%
  4. कर्नाटक – ६.९%
  5. जम्मू काश्मीर – ६.५%
  6. राजस्थान – ५.६%
  7. आसाम – ५.५%
  8. गुजरात – ५.३%
  9. पश्चिम बंगाल – ४.१%
  10. महाराष्ट्र – ३.२%

वरील आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या लसीवरून ३.२% वेस्टेज इतर राज्यांच्या तुलनेने फार कमी आहे. दररोज ३४ लाख लोकांचे लसीकरण; मोहीम एका दृष्टिक्षेपात देशात दररोज सरासरी ३४ लाख ३० हजार ५०२ लसींचे डोस दिले जात आहेत. आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले की, आतापर्यंत सरासरी ९ कोटी ०१ लाख ९८ हजार ६७३ डोस देण्यात आले आहेत.

 

News English Summary: In states where the BJP is in power, there is a plan to provide large quantities of vaccines without taking into account the number of patients and the population. Is clearly coming to the fore.

News English Title: BJP nationwide politics over corona vaccine distribution news updates.

हॅशटॅग्स

#india(222)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x