6 January 2025 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

भाजपचे प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु | आरएसएस'च्या मार्गदर्शनाखाली 'सेवा हीच संघटना' अभियान

RSS Meeting

नवी दिल्ली, १५ जून | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारसह भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. आता या खराब झालेल्या इमेजला सुधारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आरएसएस’च्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्ग भारतीय जनता पक्षाने ‘सेवा हीच संघटना’ नावाचे अभियान सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांना लसीकरण प्रोग्राममध्ये भाग घेण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, लसीकरण मोहिमे व्यतिरिक्त, मदत कार्यात आणि खेड्यांमधील स्वयंसेवक आरोग्य सेवेच्या प्रशिक्षणात भाग घ्या. यात 45 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना लस कशाप्रकारे देता येईल, हे ठरवावे. 18-44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावरही फोकस करा आणि ज्यांना संक्रमणाचा जास्त धोका असेल, त्यांना लसीकरणात प्राथमिकता द्या. सामानांची डिलीव्हरी करणारे, ऑटो रिक्शा ड्रायवर, घरांमध्ये काम करणारे, न्यूज पेपर वाटप करणारे, गॅस सिलेंडर्सची डिलीव्हरी कराणारे, इत्यादींना लसीकरणासाठी जागरुक करा. ब्लड डोनेशन कँप आयोजित करा आणि गरजवंतांना आणि हॉस्पिटलमधील रुग्णांना जेवणाची सोय करा.

इमेज सुधारण्यासाठी आतापर्यंत 3 गोष्टी केल्या:
* पहिली: दुसर्‍या लाटेत जेव्हा केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर गैरव्यवस्थेचा आरोप केला गेला, तेव्हा भाजपाने कोरोनाविरूद्ध मोहिमेमध्ये कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे निर्देश दिले. मोदींचे 7 वर्षे पंतप्रधान म्हणून पूर्ण झाल्याचा मोठा कार्यक्रम झाला नाही.

* दुसरी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 जूनला देशाला संदेश दिला. 18+चे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली.

* तिसरी: भाजपने सेवा हिच संघटन अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BJP Party Covid 19 criticism plan as per RSS strategy campaign under Seva Hi Sangathan news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x