25 November 2024 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

संतापजनक! मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं पुस्तक भाजपकडून प्रकाशित

Chhtrapati Shivaji Maharaj

नवी दिल्ली: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं हे पुस्तक दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रकाशित झालं आहे. मात्र, या पुस्तकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटणारं नाही.

मराठा क्रांती मोर्चानेही या पुस्तकाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आपण प्रधानमंत्री आहात आपला सन्मान आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना कधीही शक्य नाही या घटनेचा निषेध करतो, असं समन्वयक विनोद पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपच्या या पुस्तक प्रकाशनामुळे विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी अनेक महापुरुषांशी आणि देवी-देवतांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती, तर भाजपच्या प्रवक्त्यांपासून ते देशपातळीवरील नेत्यांनी मोदी आम्हाला भगवान विष्णू समान असल्याचं म्हटलं होतं. मात्र नुकतीच राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला ६३वा महापरिनिर्वाण दिन पार पडला तेव्हा देखील अशक्य असलेल्या तुलना भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी सुरु केल्या होत्या.

तसंच वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेवरील खासदार अमर साबळे एका मुलाखतीत केलं होतं. त्यावेळी साबळे म्हणाले की, भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याच्या उलटसुलट चर्चा सुरु होती. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला भारतीय जनता पक्षात आजिबात डावललं जात नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी म्हटले होते. तसेच ओबीसी वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानिक अधिकार मिळवून दिला आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत खासदार साबळे यांनी मोदींचे कौतुक केले होतं.

 

Web Title:  BJP Party inaugurated book Aaj Ke Shivaji Narendra Modi.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x