3 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

व्वा काय लॉजिक! ३०३ जागा जिंकणारे राष्ट्रीय आपत्ती अन ५ जागा वाले राष्ट्रीय संपत्ती? - भाजप

Sharad Pawar, BJP, AAP, Delhi Election 2020

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या विजयामुळे मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. हा विजय निश्चित होताच. यापूर्वी इतर काही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतही पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. दिल्लीत आपचा विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच भाजपाला राष्ट्रीय आपत्ती असं संबोधलं होतं.

सीएए, एनआरसीसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपनं दिल्लीत जोरदार प्रचार केला होता. भाजपची सत्ता येणारच असा दावा निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होता. मात्र, भाजपची पुरती पीछेहाट झाली. निकालानुसार आम आदमी पक्ष ६२ जागा तर, भाजप अवघ्या ८ जागा आल्या . या पार्श्वभूमीवर देशभरातून दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया आल्या होत्या.

त्यावेळी पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरेंच्या ९ फेब्रुवारीच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले.. या नेत्यांची भाषणं ऐकायला आणि पाहायला लोक येतात” असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

मात्र भाजपने पवारांच्या प्रतिक्रियेवर जोरदार टोला लगावला आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपाने ट्विट केलं आहे की, वाह पवार साहेब वाह!, ३०३ जागा जिंकणारी भाजपा ही राष्ट्रीय आपत्ती अन् ५ जागा जिंकणारी राष्ट्रवादी ही राष्ट्रीय संपत्ती! काय लॉजिक आहे. आता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल हीच अपेक्षा आहे असं सांगत शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ उमेदवार उभे केले होते. या पाचही उमेदवारांचा पराभव झालेला आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गोकळपूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे फतेह सिंह यांना ४१९ मते पडली तर याठिकाणी आपचे उमेदवार सुरेंद्र कुमार यांना ८८ हजार मते मिळून विजयी झाले. बाबलपूर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार झाहिद अली यांना १०० मते, छत्तरपूर येथे राष्ट्रवादीचे राणा सुजीत सिंह १७१ मते, मुस्तफाबाद येथील उमेदवार मयूर भान यांना २८८ मते पडली आहेत.

 

Web Title: BJP Party reaction after Sharad Pawar statement over Delhi Assembly Election 2020.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x