23 February 2025 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भारताचे २० जवान शहीद झाले तरी भाजपच्या व्हर्च्युअल रॅली सुरू होत्या, टीका होताच बंद

BJP party, virtual rally canceled, Rahul Gandhi

नवी दिल्ली, १८ जून : पूर्व लडाखमधील भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना चोख उत्तर देताना भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत. असे असताना भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हर्च्युअल रॅली सुरूच ठेवल्या होत्या. मात्र काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपाच्या या स्वार्थी राजकारणावर कडाडून टीका करताच आज भाजपाने यापुढील व्हर्च्युअल रॅली रद्द केल्या आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज या व्हर्च्युअल रॅलीज व भाजपाचे सर्व राजकीय कार्यक्रम दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या या टर्मची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त आणि बिहार ‍व पश्चिम बंगाल येथील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाचे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हर्च्युअल रॅलीज संबोधित करीत आहेत. भारत-चीन सीमेवरती 15-16 जूनच्या मध्यरात्री भारताच्या 20 जवानांना चिनी सैनिकांनी ठार केले. त्याच दिवशी संध्याकाळी जे. पी. नड्डा यांनी एका रॅलीला संबोधित केले होते. त्याशिवाय काल 17 जून रोजी रात्री दहा वाजेपर्यंत आसामच्या रॅलीज मध्ये नड्डा व्यस्त होते. उद्या 19 जून रोजीही विविध राज्यात व्हर्च्युअल रॅलीज होणार होत्या. मात्र आता राहुल गांधींनी फटकारे लावल्यामुळे या रॅली रद्द करण्यात आल्या आहेत.

लढाखच्या गलवान भागात चिनी सैनिकांशी सामना करताना मारले गेलेले 20 जवान हे “बिहार रेजिमेंट”चे सैनिक होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे बिहारमध्ये एकच शोककळा पसरली आहे. तरीही भाजपाने आपल्या व्हर्च्युअल रॅलीज बिहारमध्ये सुरू ठेवल्या होत्या. मात्र राहुल गांधींनी भाजपाचा हि ढोंगी राष्ट्रभक्ती चव्हाट्यावर आणताच भाजपाने या व्हर्च्युअल रॅलीज रद्द केल्या आहेत.

 

News English Summary: Twenty Indian soldiers have been killed while responding to Chinese troops infiltrating the Indian border in eastern Ladakh. Meanwhile, the BJP had continued its virtual rallies for the Assembly election campaign. However, after Congress leader MP Rahul Gandhi sharply criticized the BJP’s selfish politics, the BJP today canceled the next virtual rally.

News English Title: BJP party virtual rally canceled after Rahul Gandhi criticized News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x