22 November 2024 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

इतर नेत्यांचे प. बंगाल दौरे शांततेत | भाजप नेत्यांच्या दौऱ्यात प.बंगाल अशांत कसा होतो?

BJP President JP Nadda, West Bengal, controversy

कोलकत्ता, ११ डिसेंबर: परप्रातीयांच्या आंदोलनावरून देशात परिचित असलेले राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन त्याच संदर्भात पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंचा सर्वाधिक विरोध हा युपी बिहारच्या लोंढ्यांना आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर होरावून घेतला जातो. मात्र देशभरात राज ठाकरे यांना मराठी शिवाय कोणत्याही लोकांना विरोधच आहे असा सरसकट प्रचार माध्यमांनी केला आहे. माध्यमांनी अशी चुकीची ख्याती केलेले राज ठाकरे पश्चिम बंगालमध्ये जातात तरी कोणतीही शुल्लक अनुचित घटना संपूर्ण राज्यात घडत नाही. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या सर्वांच्या बाबतीत वारंवार घटना घडत असल्याने दुसरीच शंका व्यक्त करण्यात येतं आहे.

वास्तविक पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठ्या प्रमाणावर विकास करून उद्योजकांना राज्यात आणलं आहे. त्यात उद्योजकांनी देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील निर्माण होतं आहे. २०१९ हे वर्ष ममता बॅनर्जी यांनी मोठं मोठे बिझनेस समिट घडवून चांगलंच गाजवलं. त्यामुळे राज्यात उद्योजकांना सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्यांवर निवडणूक जिंकता येणार नसल्याने धार्मिक, जातीय आणि अशांततेचं वलय निर्माण केल्याशिवाय निवडणुकीत निभाव लागणार नाही हे भाजपच्या नैतृत्वाला चांगलंच माहिती आहे. त्याने CAAचा मुद्दा देखील देशातील एकाच म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तापवला गेला. त्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळत चालल्याने निवडणूक जवळ आलेल्या राज्यांमध्ये इतर विषयावरून वातावरण तापत ठेवण्याची गरज देशातील सत्ताधाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लगेचच अमित शाह पश्चिम बंगालमध्ये जाणत आहेत. यापूर्वी अशीच घटना अमित शाह यांच्या बाबतीतही घडली होती आणि योगायोगाने आता जेपी नड्डा यांच्या सोबत देखील. त्यानंतर देशभर ठराविक वृत्त वाहिन्यांनी याला मोठी प्रसिद्धी देखील दिली. ममता बॅनर्जी यांनी देखील जेपी नड्डा यांच्या सोबत एकाद्या प्रमाणात मीडियाची लोकं गाड्यांचे ताफे घेऊन का होते असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असं देखील ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.

दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र समाज माध्यमांवर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केलाय. तृणमूल काँग्रेसनं हा हल्ला घडवून आणल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलाय. तर तृणमूल काँग्रेसनं मात्र हा हल्ला ‘बनावट’ असल्याचा दावा केलाय. राज्यात दाखल होणारे नेते आपापल्या उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात, तरीही भाजप नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो, असाही प्रश्न या निमित्तानं मोईत्रा यांनी उपस्थित केलाय.

दुसरीकडे नड्डा यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आणि त्यामागे जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्यांबद्दल देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी शंका उपस्थित केलीय. “तुमच्या ताफ्यामागे ५० गाड्या का होत्या? बाईक आणि प्रसारमाध्यमांचा गाड्या का होता? तिथे कोण उभं होतं? दगड कोणी फेकले? ते सर्व नियोजित होतं का? तुम्ही खूप हुशार आहात,” असं ममता यांनी भाजपावर टीका करताना म्हटलं आहे.

 

News English Summary: In West Bengal on Thursday, Bharatiya Janata Party national president J. P. Speaking on the attack on Nadda’s convoy, West Bengal Chief Minister Mamata Banerjee has strongly criticized the Bharatiya Janata Party. While Trinamool Congress workers have been accused of attacking Nadda’s convoy, Mamata has accused BJP leaders and workers of having no business. “They have nothing else to do. Sometimes the Union Home Minister comes here and sometimes Chadda, Nadda, Fadda, Bhadda. When they don’t have an audience, they call their activists for a gimmick, “she said, referring to the attack on Nadda’s convoy.

News English Title: BJP President JP Nadda visit in West Bengal made controversy in India news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x