24 January 2025 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | आता सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिना 7,500 रुपये पेन्शन मिळणार, मोठ्या फायद्याची अपडेट आली Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी 1 शेअर वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: REDTAPE Property Rights | 90% पुरुष मंडळींना माहित नाही, मुलींना लग्नानंतर वडिलांची संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा IREDA Share Price | इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA 8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या
x

दिल्ली निकाल भाजप विरोधात जाताच वादग्रस्त ट्विव सुरु; मोदींना थेट छत्रपती म्हटलं

Uma Bharti, Chhatrapati Shivaji Maharaj, PM Narendra Modi

नवी दिल्ली: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एकेकाळच्या फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांच्या एका ट्विटमुळे पक्षाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख छत्रपती असा करत दिल्लीच्या निवडणुकीत पराभव होऊनही उमा भारतींनी मोदींचाच जयजयकार केला आहे. या त्यांच्या ट्विटमुळे समाज माध्यमांवर मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ‘दिल्ली विधानसभा चुनाव का संदेश’ असं म्हणत उमा भारती यांनी २-३ ट्वीट करत मोदींचंच अभिनंदन केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. मात्र दुपारी कल जवळपास निश्चित होताच वादग्रस्त ट्विट करून लोकांचं लक्ष इतरत्र वर्ग करण्याचा पुन्हा हेतुपुरस्कार केला गेल्याची चर्चा रंगली आहे. उमा भारती यांनी तीन ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार केला आहे. ‘संपूर्ण देशाच्या जनतेने मोदींना आत्मसात केलं आहे आणि मोदींनी जनतेला आत्मसात केलं आहे. छत्रपती मोदी झिंदाबाद’, असं उमा भारती यांनी लिहिलं आहे.

दरम्यान, उमा भारती यांनी केलेल्या ट्विटमुळे वाद रंगण्याची चिन्हं आहेत. जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे आणि ते भारतीय जनता पक्ष कार्यालयात प्रकाशित केलं गेल्यामुळे भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठली होती. आता भारतीय जनता पक्षाच्या एके काळच्या फायर ब्रांड नेत्या अशी ओळख असलेल्या उमा भारती यांनी ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. उमा भारती यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले होते. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आलं होतं ज्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं होतं.

 

Web Title: BJP Senior Leader Uma Bharti made controversial twit over Modi calling him Chhatrapati Modi.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x