20 April 2025 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

सूरतचे भाजप अध्यक्ष व पक्षातील अन्य नेत्यांविरोधात BJP IT सेलची आक्षेपार्ह पोस्ट | अटकेनंतर पक्षांतर्गत वाद

BJP IT Cell

गांधीनगर, २६ मे | गुजरात सुरतमध्ये भाजप विरोधात भाजप आयटी सेल असा सामना रंगला असून वाद टोकाला गेला आहे. विशेष म्हणजे IT सेल पदाधिकाऱ्याच्या स्वकियांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट नंतर त्यांना अटक झाली आणि सुरत भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. विशेष अटक झालेल्या पदाधिकाऱ्याची प्रतिमा चांगली असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन देखील मिळत आहे.

सूरतचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नीरज झांझमेरा आणि पक्षातील अन्य नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. परंतु या अटकेमुळे भारतीय जनता पक्षामधील अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी या अटकेविरोधात आघाडी उघडली असून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नितेश वनानी आहे. ते सूरतमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलमध्ये काम करायचे. सूरत सायबर क्राईम ब्रांचचे निरीक्षक प्रशांत खोखरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश यांनी राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या. त्यामुळे त्या नेत्यांची प्रतिमा मलीन झाली. या पोस्ट १९ वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आल्या. ही सगळी अकाऊंट बोगस आहेत. या पोस्ट १२ कॉम्प्युटर्सवरून व्हायरल करण्यात आल्या. यामुळे नितेश वनानी यांना अटक करण्यात आली.

कॉमर्समध्ये पदवी मिळवलेले नितेश रियल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतात. ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत. नितेश यांच्या अटकेविरोधात सूरतमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते एकवटले आहेत. सूरत शहरातील ६ वॉर्ड अध्यक्ष, ४ महामंत्री यांचा यामध्ये समावेश आहे. यातील अनेकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सूरत भाजपमधील काही नेत्यांच्या इशाऱ्यावरून नितेश यांना अटक झाल्याचा आरोप या नेत्यांपैकी अनेकांनी केला आहे.

 

News English Summary: Nitesh, who has a degree in Commerce, works as a real estate broker. He has remained an active BJP worker. Many BJP workers and leaders have gathered in Surat to protest against Nitesh’s arrest. This includes 6 ward presidents and 4 general secretaries in Surat city.

News English Title: BJP Suarat IT cell political war in Gujarat news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPITCell(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या