16 April 2025 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

वसुंधरा राजे नाराज | समर्थकांनी वेगळा राजकीय मंच स्थापला | जिल्हा निहाय अध्यक्ष नेमले

BJP Vasundhara Raje, supporters, Separate organisation, Rajasthan

नवी दिल्ली, ९ जानेवारी: मोदी-शहा जोडीने राजस्थानमधील सरकार उलटून लावताना वसुंधरा राजेंना कोणतीही कल्पना दिली नव्हती आणि त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं. राजस्थान काँग्रेसमधील महत्वाचे तरुण नेते सचिन पायलट यांना हाताशी धरून मागील काही महिन्यापासून राजस्थान सरकार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती.

सदर योजना राबवताना मोदी-शहा जोडीने वसुंधरा राजेंना प्रतिस्पर्धी म्हणून सचिन पायलट यांना मोठं करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय आणि नेमकी तीच मोदी-शहांची जोडीची खेळी वसुंधरा राजे यांनी वेळीच ओळखली आणि शांत राहून संपूर्ण खेळ पलटवला होता असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं.

मोदी-शहा यांना राजस्थानमध्ये केवळ भाजपचं सरकार नको होतं, तर त्यासोबत वसुंधरा राजेंना शह देऊन स्वतःकडे संपूर्ण राज्याची सूत्र घेण्याची योजना आखली होती. आजही माजी मुख्यमंत्री असलेल्या वसुंधरा राजे गप्प आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवर वसुंधरा राजेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

त्यानंतर राज्यस्थानमध्ये एकीकडे काँग्रेसमधील कलह वाढत असताना आता भारतीय जनता पक्षातील गटबाजी आणि असंतोष चव्हाट्यावर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना बाजूला सारल्यानंतर नाराज असलेल्या समर्थकांनी थेट वेगळी गट स्थापन केली आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनी वेगळा राजकीय मंच स्थापन केला असून, वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच असे याचे नामकरण करण्यात आले आहे.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे समर्थकांनी राजस्थानमधील प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्ष नेमण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय युवा संघटना आणि महिला संघटनांची स्थापना केली जात आहे. भारतीय जनता पक्षात अशा प्रकारे वेगळा गट स्थापन करण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती केंद्राकडे भाजपच्या दुसऱ्या गटाने पोहोचवली आहे. त्यानंतर दिल्लीतील भाजप वरिष्ठांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

News English Summary: While factionalism within the Congress is on the rise in the state, factionalism and discontent within the BJP are now on the rise. Disgruntled supporters have formed a separate group after former chief minister Vasundhara Raje was sidelined. Vasundhara Raje’s supporters have set up a separate political forum, renamed Vasundhara Raje Samarthak Rajasthan Manch.

News English Title: BJP Vasundhara Raje supporters created separate organisation Rajasthan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या