भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही - भाजप आ. गोविंद पटेल
मुंबई, २२ मार्च: देशात सलग ११ व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ झाली. रविवारी ४४,०४२ रुग्ण आढळले. त्यातील एकट्या महाराष्ट्रातील ३०,५३५ रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान जेव्हा रोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी ४४ हजार होती तेव्हा रोज सरासरी ५१४ मृत्यू होत होते. आता पुन्हा ४४ हजार रुग्ण आढळत आहेत, पण रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी १८० च्या खाली आहे. म्हणजे आधीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी मृत्यू होत आहेत. देशात गेल्या ३० दिवसांतच रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजारांवरून ४४ हजारांवर गेली आहे. म्हणजे तिपटीपेक्षाही जास्त वाढ. रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या १०१ वरून १९७ झाली आहे, म्हणजे दुपटीपेक्षाही कमी वाढ झाली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील ८५.१४% नवे रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेश या ६ राज्यांतील आहेत. देशातील काही शहरे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे जात आहेत. त्यात मुंबई, पुणे, नागपूर प्रमुख आहेत. देशात एकूण संक्रमित १.१५ कोटींवर असून सक्रिय रुग्ण ३ लाखांवर आहेत.
दरम्यान, गुजरातमधील भाजपा आमदाराने कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राजकोट (दक्षिण) मदतदासंघाचे भाजपा आमदार असणाऱ्या गोविंद पटेल यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही, असं पटेल यांनी म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करोना नियमांचे उल्लंघन होत आहे असं तुम्हाला वाटत नाही का?, या प्रश्नाला उत्तर देताना पटेल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
News English Summary: BJP MLA has made a controversial statement regarding corona infection. This statement has been made by Govind Patel, BJP MLA of Rajkot (South) Aid Association. “BJP workers work very hard and that is why they are not infected with corona,” Patel said.
News English Title: BJP workers work very hard and that is why they are not infected with corona said BJP MLA Govind Patel news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN