मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई, ३० एप्रिल | मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन झालं. जगदीश अवघ्या ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
जगदीश लाडने अतिशय कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास ४ वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत २ वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं. मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनने जगदीश लाडच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन शिपमध्ये जगदीश यांनी कास्य पदकावर आपली मोहर उमटवली होती. दरम्यान राज्यातील अनेक बॉडीबिल्डींग स्पर्धांमध्ये जगदीश यांनी भाग घेत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. आज राज्यातील अनेक प्रसिद्ध बॉडीबिल्डर्समध्ये जगदीश यांचे नाव घेतले जाते.
News English Summary: Maharashtrian bodybuilder Jagdish Lad, who won Mr. India’s book, died due to corona. Jagdish was just 34 years old. He has breathed his last in Baroda. Jagdish’s demise has caused a great stir in the bodybuilding world.
News English Title: Bodybuilder Jagdish Lad passes away due to corona news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा