16 April 2025 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

फिल्मी अक्षयची जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या पोस्ट 'Like'वर फिल्मी प्रतिक्रिया

Bollywood Actor Akshay Kumar, anti cab protests Jamia Millia Islamia

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांची हिंसक निदर्शने आणि विद्यापीठ परिसरातील वाढता तणाव लक्षात घेऊन दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठाला हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे.

जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले व बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी प्रसार माध्यमांना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या.

या संदर्भातील एका पोस्टवर बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने लाईक केलं आणि त्याबद्दल माहिती सर्वत्र पसरली. मात्र आता अक्षय कुमारने त्यावर अजब राजकीय नेत्यांप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, मी स्क्रोल करत असताना चुकून जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाईक केलं क्लिक झालं आणि मात्र मला ते समजल्यावर मी ते पुन्हा अनलाइक केलं आहे आणि अशा हिंसेचं मी समर्थन करत नाही असं पुन्हा ट्विट केलं आहे.

विशेष म्हणजे २०१४ पूर्वी युपीए सरकार असताना अक्षय कुमारने पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर देखील ट्विट करत आता मी माझी सायकल तयार ठेवल्याचं म्हटलं ट्विट केलं होतं. मात्र त्यानंतर मोदी सरकार सत्तेत येताच पेट्रोलचे भाव त्यापेक्षाही गणनाला भिडल्याने आणि मोदी भक्त असल्याने ते ट्विट डिलीट केलं होतं. अशा अनेक ऑनलाईन कथा लिहिण्यात अक्षय माहीर असून लोकं मूर्ख असल्याच्या अविर्भावात नेहमी प्रतिक्रिया देत असतो.

काय होतं ते पेट्रोलच्या वाढत्या बद्दलचं युपीए सरकारच्या काळातील ट्विट जे त्याने मोदी फेल गेल्यावर डिलीट केलं होतं.

 

Web Title:  Bollywood Actor Akshay Kumar over anti cab protests Jamia Millia Islamia Protest Social Media Post

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या