योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा | यूपीत राष्ट्रपती राजवट लावा - स्वरा भास्कर

लखनऊ, ३० सप्टेंबर : माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.
पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.
दरम्यान उत्तर प्रदेशात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मागील काही दिवसात पत्रकारांना सुद्धा ठार मारण्यात आलं आहे. राज्यातील कायदा सुव्यस्थेवर मोठं प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहेत. परिणामी अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. तसेच उत्तर प्रदेशात बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस केवळ एक उदाहरण आहे असं स्वराने म्हटलं आहे.
It’s time. @myogiadityanath should RESIGN. Under him utter breakdown of law & order in UP. His policies have created caste strife, fake encounters, gang wars & there is a RAPE EPIDEMIC in Uttar Pradesh. #Hathras case is only one example. #YogiMustResign #PresidentRuleInUP
— Swara Bhasker (@ReallySwara) September 29, 2020
News English Summary: It’s time CM Yogi Adityanath should RESIGN. Under him utter breakdown of law and order in Uttar Pradesh. His policies have created caste strife, fake encounters, gang wars and there is a RAPE EPIDEMIC in Uttar Pradesh. Hathras case is only one example so Yogi Must Resign and President Rule In UP said Swara Bhaskar.
News English Title: Bollywood actress Swara Bhaskar twit about President Rules in Uttar Pradesh Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल