9 January 2025 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा
x

आमिर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, संपर्कातील लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Bollywood superstar, Aamir Khan, Staff Test Coronavirus Positive

मुंबई, ३० जून : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्याच्या संपर्कातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली असून याबाबतची माहिती स्वतः आमिरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच सगळे क्वारंटाईन झाले असून आमिर त्याच्या आईसह स्वतःचीही कोरोना चाचणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

अमित पोस्टमध्ये म्हणाला;
माझ्या काही कर्मचाऱ्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि करोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे खूप आभार मानतो.

उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझी चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या आईला करोना चाचणीसाठी घेऊन जात आहे. तिचाही रिपोर्ट निगेटीव्ह येऊ दे अशी प्रार्थना करा. त्वरित आणि काळजीपूर्वक उपाय केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन या रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. करोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली.

 

News English Summary: Corona has infiltrated the house of Bollywood actor Aamir Khan. Some of his contacts have been infected with the corona, according to Aamir himself via Twitter.

News English Title: Bollywood superstar Aamir Khan Staff Test Coronavirus Positive News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x