16 January 2025 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

देशाला २०२० पर्यंत महासत्ता बनविण्याचं कोणीतरी सांगितलं होतं: बॉक्सर विजेंदर सिंग

Boxer Vijender Singh, PM Narendra Modi

नवी दिल्ली: जगविख्यात भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग नेहमीच मोदी सरकारला त्यांच्या ध्येय धोरणांवरून लक्ष करताना दिसला आहे. मात्र यावेळी झालं असं की, तामिळनाडूतील सेलम शहरात एका आईने तिच्या तीन मुलांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी चक्क स्वतःचे केस कापून ते १५० रुपयांना विकले आणि मुलांची पोटाची भूक बघवली. त्या आईचं नाव प्रेम असं तिचं वय ३१ वर्ष असल्याचं समोर आलं. तिच्या पटीने ७ महिन्यापूर्वी आत्महत्या केल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेच वृत्त ट्विट करत विजेंदरने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत, मोदी सरकारची एका वाक्यात पोलखोल करून त्यांच्या खोट्या आश्वासनांवरून प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानुसार, ‘कोणीतरी देशाला २०२० मध्ये महासत्ता बनविण्याचं म्हटलं होतं’ अशी आठवण करून देत देशातील भीषण परिस्थितीवरून टोला लगावला आहे.

तत्पूर्वी, दिल्लीत जेएनयू युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या विरोधात आपला आवाज उठवत आहेत. भारतीय संघाचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दर्शवला होता.

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर विजेंदरने आपलं मत व्यक्त केलं होतं. जेव्हा तुम्ही चर्चेत जिंकता, तेंव्हा ते तुमच्यावर वैक्तीगत हल्ला करतात, असं ट्विट विजेंद्र सिंगने केलं होतं. त्यावर एका नेटकऱ्याने विजेंद्रला उपदेश देण्याचा प्रयत्न केला. विजेंदर तु बॉक्सिंगवरच लक्ष केंद्रीत कर, या बिनकामाच्या भानगडीत पडू नकोस. एक खेळाडू म्हणून तू आम्हाला आवडतोस, अस नेटकऱ्याने म्हटले होते.

विजेंदरच्या या वक्तव्यावर एका नेटकऱ्याने, तू फक्त बॉक्सिंगकडे लक्ष दे. या फालतुच्या लफड्यांमध्ये कशाला अडकतोस, एक खेळाडू म्हणून तु आम्हाला आवडतोस अशी कमेंट केली. विजेंदरनेही या नेटकऱ्याला आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे, जाट हूँ अंधभक्त नही ! असं म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

 

Web Title:  Boxer Vijender Singh Slams PM Narendra Modi over developed India commitment.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x