Brand Rahul Gandhi | ऑपरेशन लोटस नव्हे! आता कर्नाटकात काँग्रेस पक्ष भाजपच्या लोटसचं ऑपरेशन करणार, डझनभर आमदार काँग्रेसच्या वाटेवर
Operation of Lotus | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झालेल्या भाजपला राज्यात आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. राज्यात नव्हे तर देशात मोदी सरकार विरोधात वातावरण निर्माण झालं आहे. याची चुणूक भाजपच्या श्रेष्ठींना देखील आहे, पण ते सध्या वेगळाच आव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातंय.
भाजपचे अनेक आमदार काँग्रेसच्या गोटात प्रवेश करणार
कर्नाटक मध्ये येत्या काही दिवसांत भाजपचे अनेक आमदार काँग्रेसच्या गोटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने आणि त्यापूर्वी बेंगळुरू महानगरपालिकेच्या निवडणुका असल्याने याबाबत काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह आहे. पक्षांतर करण्यास इच्छुक असलेले बहुतांश आमदार असे आहेत, ज्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे आघाडी सरकार कोसळले होते. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसने अत्यंत महत्वाची केल्याने अधिक जागा निवडून आणण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कर्नाटक राज्य सुद्धा महत्वाचं असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डि.के. शिवकुमार यांच्यावर मोठी जवाबदारी देण्यात आली आहे.
टप्प्याटप्प्याने या आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणार
हळूहळू वातावरण तयार करता यावे यासाठी पक्ष टप्प्याटप्प्याने या आमदारांना घेईल, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यशवंतपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर यांच्या एका वक्तव्यामुळेही अशा चर्चांना उधाण आले आहे. माजी सहकार मंत्री काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत दिसले होते. निमित्त होते केंपेगौडा विमानतळाच्या आराखड्याची पाहणी करण्याचे.
यावेळी बोलताना सोमशेखर यांनी डीके शिवकुमार यांना आपले गुरू म्हटले होते. डीके शिवकुमार हे माझ्यासाठी गुरू आहेत आणि त्यांनी मला सहकार क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली असं सांगताना राज्य सरकारची देखील स्तुती केली होती.
सोमशेखर यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या आणखी १४ आणि जेडीएसच्या तीन आमदारांनीही तत्कालीन आघाडी सरकारमधून राजीनामा दिला होता. सोमशेखर यांच्याव्यतिरिक्त शिवराम हेब्बर, बी. बसवराजू आणि के. गोपालय्या यांच्यासह आणखी अनेक आमदार भाजप सोडतील, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. गोपालय्या वगळता इतर सर्व आमदार काँग्रेसमध्ये होते. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की या आमदारांनी सीएम सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा केली आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
गृहमंत्री म्हणाले- सोमशेखर यांनी यापूर्वी काम केले आहे
या चर्चेदरम्यान गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, ज्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे, त्यांनी यापूर्वी पक्षासाठी काम केले आहे. ‘मी प्रदेशाध्यक्ष असताना सोमशेखर बेंगळुरू शहरी जिल्ह्याचे अध्यक्षही होते. ते तीन वेळा आमदार राहिले असून ते पक्षात राहिले असते तर आज मंत्री झाले असते. सोमशेखर यांच्या पुनरागमनाला पक्षाचे नेते विरोध करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
आणखी एक आमदार मुनीरत्न काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची ही चर्चा आहे. मात्र, काँग्रेसने त्यांना विधानसभेची जागा सोडण्यास सांगितले आहे, जे ते मान्य करताना दिसत नाहीत. कारण त्यांना विधान परिषदेची आमदारकी नको आहे आणि त्यासाठी त्यांच्यासोबत पुढील चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील आमदारांवर भाजपच्या श्रेष्ठीचा वचक नाही आणि गुजरात लॉबीला ते जुमानताही नाहीत. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपामध्ये मोठी फूट पडून काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचं वृत्त आहे.
News Title : Brand Rahul Gandhi Operation of Lotus in Karnataka 18 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC