22 November 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

वाराणसी: जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द

Narendra Modi, Loksabha Election 2019

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बीएसएफ’चे बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. यामुळे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, परंतु उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला.

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर तागडे आव्हान उभे करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बीएसएफ जवान तेज बहादूर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी तेजबहाद्दूर यांना नोटीस देत संरक्षण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र आणण्यास सांहितले होते. यासाठी बुधवारी दुपारी ११ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यांना दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आज सकाळी ११ वाजता तेज बहाद्दूर यादव त्यांच्या वकिलांसोबत निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते.

निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहाद्दूर यांचा अर्ज रद्द केला. आता शालिनी यादव सपाकडून मोदींविरोधात उभ्या राहणार आहेत. यावेळी तेज बहाद्दूर समर्थक आणि पोलिसांदरम्यान जोरदार वादवादी झाली. त्यानंतर पोलिसांनी समर्थकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढले. हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर यांनी वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला ते अपक्ष निवडणूक लढवणार होते. मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननीवेळी त्यांच्या २ अर्जांमध्ये बीएसएफमधून बडतर्फ करण्याबाबत वेगवेगळी माहिती दिल्यावर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी तेज बहादूर यांना नोटिस पाठवून २४ तासांच्या आत बीएसएफचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन येण्यास सांगितले होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x