22 December 2024 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करा | योगींना मठात पाठवून द्या - मायावती

BSP Chief Mayawati, Uttar Pradesh government, criminals mafias, hathras gangrape

लखनऊ, १ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशात जंगलराज आहे अशी टीका करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांनी ही ट्विट करत ही टीका केली आहे. उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्या माणसांना आधार देण्यासाठी आपण जातो. मात्र शोकसागरात बुडालेल्या एका कुटुंबाला भेटायला गेलो तरीही सरकार आम्हाला घाबरवतंय. एवढं घाबरु नका मुख्यमंत्री महोदय या आशयाचं ट्विट करत राहुल गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावरूनच बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा” असं म्हणत मायावती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मायावती यांनी “केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तसं करू शकत नसाल तर राष्ट्रपती राजवट लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांनी योगींना गोरखनाथ मठात पाठवावे. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: BSP chief Mayawati on Thursday slammed Yogi Adityanath, saying he should resign if he cannot ensure the safety of the women in Uttar Pradesh. The BJP should send him back to the Gorakhnath Math, where he belongs, she added. This comes days after a 19-year-old Dalit woman, who was allegedly gangraped by four upper-caste men in UP’s Hathras, died while fighting for life.

News English Title: BSP Chief Mayawati says BJP Uttar Pradesh government criminals mafias rapists are having free run Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x