25 December 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

दिल्लीतील प्रत्येक नागरिकासाठी कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देणार - अमित शहा

Union Home Minister Amit Shah, Covid 19

नवी दिल्ली, १५ जून: सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्यास लोकांचा विश्वास वाढेल. जेणेकरून दिल्लीवरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर परतवता येईल, असे शहा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिल्लीतील प्रत्येक नागरिकासाठी कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणाही केली.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी ‘आप’चे नेते संजय सिंह यांनी बैठकीला हजेरी लावली होती.

दुसरीकडे, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.16) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

कर्नाटकमधील इतर राज्यांतील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्हाला या लोकांसाठी क्वारंटाइनचे नियम बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना सात दिवसांची संस्थात्मक क्वारंटाइन आणि 7 दिवस होम क्वारंटाइन केले जाईल. दिल्ली आणि तामिळनाडूमधून येणा-या लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

 

News English Summary: Union Home Minister Amit Shah has called on all political parties to fight the war against the Corona together. He was speaking at an all-party meeting in Delhi on Monday. This time, he said, if all political parties come together, people’s confidence will increase. So that the crisis of corona over Delhi can be reversed as soon as possible, Shah said.

News English Title: Bury differences join hands to battle Covid 19 in Delhi Union Minister Amit Shah at all party meet News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x