16 January 2025 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

CAA: अहमदाबादमध्ये उपद्रव्यांकडून थेट पोलिसांवर दगडफेक

CAA Ahmadabad Gujarat Protesters, Pelt Policemen with Stones

अहमदाबाद: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात उद्रेक झालेला असताना अनेक ठिकाणी पोलीस देखील हिंसाचाराचे लक्ष होतं आहेत. ईशान्य भारतानंतर उत्तर भारतात देखील हिंसक आंदोलनांनी उचल घेतल्यानंतर तीच धग आता पश्चिम भारतात देखील त्याचं लोन पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

पश्चिम भारतातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यात महाराष्ट्रात जरी शांततेत आंदोलनं सुरु असली तरी गुजरातमध्ये मात्र त्याला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, विरोधानं काही ठिकाणी हिंसक वळण घेतल्याचे प्रकार गुजरातमधील अहमदाबाद येथे घडल्याच समोर आलं आहे आणि त्याचे पडसाद देखील उमटण्याची शक्यात आहे.

आंदोलनाच्या नावाखाली हिंसक झालेल्या जमावाचा एक व्हिडीओ गुजरातमधील अहमदामधून समोर आला आहे. त्यानुसार आंदोलनानंतर काही पोलीस कर्मचारी परत जात असताना काही उपद्रव्यांनी त्यांना घेरत त्यांच्यावर तुफान दगडफेक केल्याची घटना गुरूवारी घडली. सदर व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी स्वत:ला वाचवण्याचे खूप प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

अहमदाबादमधील शाह आलम परिसरात सदर घटना घडल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अनेक स्थानिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसक आंदोलनानंतर अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनीही प्रतिक्रिया दिली. सदर प्रकरणी एकूण ३२ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिंसक आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. या घटनेत १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

 

Web Title:  CAA Ahmadabad Gujarat Protesters Pelt Policemen with Stones.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x