14 January 2025 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

३० टक्के अभ्यासक्रम कमी करणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

CBSE Board, Reduce Syllabus, Covid 19

नवी दिल्ली, ७ जुलै : सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे. या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

अभ्यासक्रम कितपत कमी करण्यात आलाय, तो शिक्षकांना विद्यार्थ्यांना समजावून सांगावा लागेल. अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून १५०० सल्ले मिळाल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले. यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी एप्रिल महिन्यात अशीच योजना तयार केली होती.

कोरोनामुळे सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. यामुळे दिवसाचे काही तास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, सिलॅबस पूर्ण करणे अशक्य बनले आहे. यामुळे सीबीएसईने अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय असून त्यांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.

 

News English Summary: The CBSE has decided to reduce the syllabus in the 9th and 12th syllabus of the 2020-2021 session by about 30 per cent. The decision has been taken on the basis of suggestions from various school management, parents, state, academics and teachers. The course has been prepared by a committee of experts from NCERT and CBSE Board.

News English Title: CBSE Board To Reduce Syllabus By 30 For Classes 9 12 Amid Covid 19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CBSE(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x