14 January 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

CBSE Board- उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

CBSE Board, 10th Class Result 2020, HRD Minister Pokhriyal

नवी दिल्ली, १४ जुलै : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी (15 जुलै) जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसंच उर्वरित पेपर जुलै महिन्यात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित पेपर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. दिल्लीतील सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्चट वर्क आणि असाईनमेंट्सच्या आधारावर जाहीर केले जाणार आहेत.

 

News English Summary: It is learned that the CBSE board’s 10th result will be announced tomorrow. Human Resource Development Minister Ramesh Pokhriyal Nishank has informed that the CBSE board’s 10th result will be announced on Wednesday (July 15).

News English Title: CBSE Class 10th Result 2020 To Release Tomorrow HRD Minister Pokhriyal News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CBSE(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x