25 December 2024 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

कोणतंही मार्केटिंग न करता लॉकडाउनमध्ये २० लाख भुकेल्यांना अन्न दिलं

Celebrity Chef Vikas Khanna, massive food drive, Delhi NCR, Lockdown

दिल्ली, १२ जून: कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यानंतर या विषाणूंचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सरकार सतर्क होते. वाढता धोका टाळण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला.कोरोना व्हायरसच्या या गंभीर संकटात अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकांनी आपआपल्या परीने मदत करत सरकारच्या प्रयत्नांना साथ दिली आहे.

लाॅकडाऊनमुळे रोजंदारीवर असलेल्या कुटूंबियांचे चांगलेच हाल झाले आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांना दोन वेळेचे अन्न मिळणेही मुश्किल झाले असताना प्रसिद्ध शेफ विकास खन्ना गरजु लोकांच्या मदतीला धावून आला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तो किन्नर आखाडा प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासोबत मिळून आतापर्यंत २० लाख लोकांना जेवण उपलब्ध करून दिले आहे.मात्र त्याने या गोष्टीचे निमित्त साधून प्रसिद्ध मिळवली नाही. आता केलेल्या कार्यामधून ख-या अर्थाने आनंद मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचा व्हिडीओ विकास यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. ही संख्या एकत्र करून, त्यांनी आतापर्यंत 120 लाखांहून अधिक गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवले आहे.

विशेष म्हणजे विकास भारतात नाही. विकास न्यूयॉर्कमध्ये आहे, परंतु गरजूंना अन्न पुरवण्यासाठी तो सातत्याने कार्यरत आहेत. न्यूयॉर्कमध्ये असल्याने तो या बरकत या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नाही. परंतु काही मित्रांनी फोटो एडिटिंगच्या माध्यमातून त्याला या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आनंद दिला. विकास यांनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

News English Summary: Offering his support and help all the way from New York City, celebrity chef Vikas Khanna is contributing to aiding the distresses during these difficult time. Khanna has always been a remarkable example for his samaritan work and has yet again come forward to assist those who need it the most.

News English Title: Celebrity Chef Vikas Khanna kicks off massive food drive in Delhi NCR all the way from New York News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x