मोटार वाहन सुधारणा विधेयक २०१९; वाहन धारकांना रोज १०-१५ हजार खिशात ठेवावे लागतील
नवी दिल्ली : वाहन धारकांना धडकी भरवणारे दंड अमलात आणण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत मोटार वाहन सुधारणा विधेयक-२०१९ सादर केले. दरम्यान रस्ते अपघात थांबविण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचावा म्हणून मोटार वाहन सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील नितीन गडकरी यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले आहे. मागील पाच वर्षात देशातील एकूण अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो हे देखील त्यांनी प्रथम मान्य केलं.
त्यामुळे या विभागाची जबाबदारी माझी असून मी ती स्वीकारत असल्याचे देखील गडकरी म्हणाले. दरम्यान सदर विषयाला अनुसरून सभागृहाला संबोधित करताना गडकरी म्हणाले, ‘लोकांना दंडाचा धाक सध्या उरलेला नाही’ अशी प्रस्तावना करत वाहतूक दंडांच्या रकमेत प्रचंड वाढ प्रस्तावित केली. लोकसभेत हे विधेयक नव्याने मांडण्यात आले असून विधेयक अधिकृतरीत्या पारित करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. यापूर्वी हे विधेयक २०१७ मध्ये लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. परंतु, राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. या विधेयकात अनेक शिफारसी असून नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईची शिफारस आहे. जाणून घेऊयात यातील काही दंडात्मक कारवाईच्या नेमक्या शिफारसींबाबत…
- कार चालवताना सीट-बेल्ट लावला नाही किंवा बाईकवर हेल्मेट घातले नसेल तर सध्याचा १०० रुपये दंड थेट १००० रुपये करण्यात आला आहे.
- अतिवेगाने गाडी चालवाल तर सध्याच्या ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड भरावा लागेल.
- वाहतुकीच्या वेळेत तुम्ही रुग्णवाहिकेला जाण्यास जागा दिली नाही तर १०००० रुपयांचा दंड
- यापुढे ड्रायव्हींग लायसन्ससाठी आधार नंबर सक्तीचा करण्यात येईल.
- सध्या लायसन्स २० वर्षांसाठी मिळते. हा कालावधी १० वर्षांवर आणण्यात येणार
- वय वर्ष ५५ पुढील लोक हे लायसन्स नुतनीकरणासाठी आणतील तेव्हा ते ५ वर्षांसाठीच दिले जाईल
- सर्व राज्यांत वाहन परवाना, वाहन नोंदणी या प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर नोंदणीकृत करण्याची सूचना
- मोटार अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये भरपाई देण्याची तरतूद
- विना पॉलिसी वाहन चालवल्यास २००० रुपयांचा दंड
- ओव्हरलोडिंगवर २० हजार रुपयांचा दंड, सीट बेल्ट न बांधल्यास १० हजार रुपयांचा दंड
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार