23 December 2024 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
x

ममता बॅनर्जी मोदींवर भडकल्या | पंतप्रधानांनी बैठकीत कोणत्याच मुख्यमंत्र्याला बोलू दिले नाही

Mamata Banerjee

नवी दिल्ली, २० मे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सामील झाल्या, पण त्यांच्या राज्याचा कुठलेही जिल्हाधिकारी सामील झाले नाही. मोदींच्या बैठकीनंतर ममतांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मोदींच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, बैठकीत 10 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते, पण कुणालाच बोलू दिले नाही. हे अपमानजनक आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही”. भारतीय जनता पक्षाचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोललं नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, परंतु बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

दरम्यान, बैठकीत मोदी म्हणाले, ‘कोरोनाची पहिली लाट असो किंवा ही दुसरी लाट असो. परिस्थिती पाहून बदल करणे, हे या महामारीने आपल्याला शिकवले आहे. हा व्हायरस म्यूटेंट होण्यात, रुप बदलण्यात तरबेज आहे. या व्हायरसशी सामना करण्यासाठी आपली पद्धत आणि स्ट्रेटजीदेखील वेगील असायला हवी. या दुसऱ्या लाटेत व्हायरसच्या नवीन म्यूटेंटमुळे तरुण आणि लहान मुलांमध्ये संसर्ग पसरण्याची भीती आहे. आपल्याला आता येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल.

 

News English Summary: If states were not allowed to speak why were they called. All the Chief Ministers must protest for not being allowed to speak: West Bengal Chief Minister Mamata Banerjee on PM Modi’s interaction with DM’s of 10 States today.

News English Title: Chief Ministers must protest for not being allowed to speak West Bengal CM Mamata Banerjee on PM Modi’s interaction news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x