16 April 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास

Chief Priest, Ram Janmabhoomi, Mahant Satyendra Das, Sambhaji Bhide

अयोध्या, ४ ऑगस्ट : ‘कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा’ असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले होते. तसंच, ‘मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी विनंतीही भिडे यांनी केली होती. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे’, असा सल्ला भिडे गुरुजी यांनी दिला होता.

5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याबाबत काल सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचबरोबर भिडे गुरुजींनी यावेळी राम मंदिर समितीला आवाहन करताना मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम-आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, अशी विनंती केली होती.

मात्र अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी भिडेंचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. संभाजी भिडेंनी भलतीसलती विधानं करू नयेत, असंदेखील दास म्हणाले. संभाजी भिडेंच्या विधानाचा महंत सत्येंद्र दास यांनी समाचार घेतला आहे. संभाजी भिडे यांनी भलतीसलती विधाने करू नयेत. जर कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या संभाजी भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच, अशा शब्दांत दास यांनी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांनी भिडे यांचा उल्लेख अज्ञानी असा केला.

 

News English Summary: Sambhaji Bhide, founder of Shiv Pratishthan, said that at least the idol in the temple to be erected in Ayodhya should have a mustache.

News English Title: Chief Priest of Ram Janmabhoomi Mahant Satyendra Das criticizes Sambhaji Bhide over his statement regarding mustache to lord ram News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)#Sambhaji Bhide(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या